कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी हरिभाऊ क्षीरसागर ३१ जुलै २०२१ रोजी नियत वयोमानानुसार ४१ वर्षे १० महिने सेवा पूर्ण करून कार्यालयीन वेळेत सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. मनोज गादेकर होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुर्वे पर्यवेक्षक प्रा. खराडे उपस्थितीत होते.
बार्शी- झाडबुके महाविद्यालयातील हरिभाऊ क्षीरसागर सेवानिवृत्त
यावेळी प्राचार्य डॉ. गादेकर यांच्या हस्ते हरिभाऊ क्षीरसागर यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती हरिभाऊ क्षीरसागर बोलताना म्हणाले की, महाविद्यालयामध्ये काम करत असताना बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके यांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असायचे तसेच बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार वर्षाताई ठोंबरे यांची प्रेरणा नेहमी काम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा देत असे.
प्राचार्य डॉ गादेकर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये ते म्हणाले, जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त महाविद्यालयाला हरिभाऊ यांनी सेवा प्रदान केली. महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलांना सुद्धा उच्चशिक्षित केले आहे. त्याबरोबरच त्यांनी हरिभाऊ यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
प्रा. अनिल गेळे हे क्षीरसागर यांच्या आठवणी सांगत असताना भाऊक झाले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख अनिल वाघमारे, जितेंद्र गाडे, उमेश मदने, परमेश्वर पवार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुरेश दराडे यांनी तर आभार प्रा मनोज गोंदकर यांनी केले.