कुतूहल न्यूज नेटवर्क
दिशा समाज विकास संस्थेच्या वतीने विधवा महिला, ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात
बार्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक सर्वसामान्य कुटुंबाचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिशा समाज विकास संस्था आळजापूर यांच्यावतीने बार्शी तालुक्यातील १० गावातील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किट भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे, राहुल भड, तलाठी कार्यालय कर्मचारी हरीचंद्र वडवे , पोलीस कर्मचारी अमर सुतकर, शंकर वडवे, डिजिटल सखी कार्यकर्त्या राही ताटे, मोहिनी डांगे, सुवर्णा पंढरे, शारदा गायकवाड, मनीषा गायकवाड, रोहिणी इंगळे आणि अस्मिता सुरवसे आदी उपस्थीत होते.