fbpx

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उडान फाऊंडेशनची गरजूंना मदत

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून बार्शीतील उडान फाऊंडेशनच्या वतीने पिंपळगाव (पा) येथील कॅन्सरपीडित नागनाथ खंदारे यांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पायांचे आँपरेशन झालेले भटक्या समाजातील व स्थलांतरित वस्तीतील राजू वाघमारे यांना किराणा साहित्याची अतिशय गरज असताना उडाननं पुन्हा एकदा उडान भरुन माणूसकीचा पुल बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

खरतंर हा समूह मुस्लिम बांधवांचा, मात्र जाती-धर्माच्या पलिकडे मानवतेच्या विचारधारेवर कार्य करणार्‍या उडाननं आजवर अनेक विधायक कामं केले आहेत. जिजाऊ जयंतीच्यानिमित्ताने जातीयतेच्या चौकटीत न अडकवून घेता फाऊंडेशनने सामाजिक जाणीवेतून केलेली मदत अनेकांना प्रेरणादायी अन् ऊर्जादायी ठरणार आहे.

उडान फाऊंडेशनचे सल्लागार युन्नुस भाई शेख, अध्यक्ष इरफानभाई शेख,उपाध्यक्ष, इलियासभाई शेख, कार्याध्यक्ष शकिलभाई मुलाणी खजिनदार शोहेबभाई काझी, हाजीभाई शिकलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे फाऊंडेशन काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *