fbpx

छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योध्दांचा सन्मान

वैराग प्रतिनिधी  (काशिनाथ क्षीरसागर) : स्वराज्यावर आलेली संकटे परतवून लावण्याचे जे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते त्याचं अनुकरण आजच्या मावळ्यांनी केले पाहिजे. कोरोना रूपी महाभयंकर संकटाचा सामना करणार्‍या योद्धांचा सन्मान करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील जयंती उत्सव मंडळाने महाराजांची शिकवण जोपासली आहे, असे प्रतिपादन माजी उपसभापती केशव घोगरे यांनी छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त ‘कोविड योध्दा सन्मान’ सोहळा प्रसंगी बोलताना केले .याकार्यक्रमाच्या अध्यक्ष शिवाजी निकम होते .

या कोविड योध्दा सन्मान सोहळ्यास माजी जि प सदस्य संतोष निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, बार्शी पंचायत समितीच्या उपसभापती मंजुळा वाघमोडे, नंदकुमार पांढरमिसे, रणजित काशिद, वैजिनाथ आदमाने, हरिश्चंद्र भोसले, डॉ. भारत पंके, मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष ईस्माईल पटेल, संदिपान निंबाळकर, जनसेवा संघटनेचे सुनिल पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

यावेळी कोविड योध्दा म्हणून खालील सत्कारमुर्तीचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

वैद्यकीय अधिकारी : डॉ. मजीद चौधरी, डॉ. अजित सपाटे, डॉ.प्रशांत दळवी, डॉ. जयवंत गुंड, डॉ. पवन गुंड डॉ.सुहास मोटे ,डॉ. संताजी देशमुख व डॉ. सचिन चव्हाण.

देशसेवा बजावून निवृत्त झालेले माजी सैनिक : अमोल धायगुडे, किशोर चौधरी, दिपक खेंदाड, जगन्नाथ आदमाने, संभाजी जांभळे, शिवाजी जाधव.

आरोग्य विभागातील कर्मचारी : वर्षा गोवर्धन, मनिषा मुंढे, बालीका पाटील, सुलभा मगर, वंदना मचाले, सुषमा सट्टे, आबासाहेब कांबळे, सतिश जिरगे, अविनाश अंकुश , शिवाजी आवारे ,जगदीश ताकभाते, प्रकाश गुंजाळ, बाबासाहेब स्वामी.

पोलीस अधिकारी /कर्मचारी /होमगार्ड : दत्तात्रय मस्के, दिलशाद सय्यद , शिवाजी जाधव, संतोष टिपे, किशोर खस्टमील, शोभा कावरे, पत्रकार आनंदकुमार डुरे, बलभिम लोखंडे, निलेश उबाळे, किरण आवारे, कालिदास देवकते, मुजमिल कोठाळकर, शिल्पकार सुहास सुतार व श्रीकांत रेडे यांचा सत्कार करण्यात आला . सूत्रसंचालन महेंद्र लोंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष बाबा माने (रड्डी ) यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *