कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: गौडगाव ता. बार्शी येथील लक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गौडगाव येथील कोविड सेंटरमध्ये सेवाबजावणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कस, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि खाजगी दवाखान्यातील डॉक्टर यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानपत्र, फुल, वृक्षरोपे देऊन सत्कार करण्यात आला. गौडगावचे सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, वैद्यकीय अधिकारी वृषाली पाटील, वैद्यकीय अधिकारी अजित सपाटे यांच्या हस्ते कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोविड योद्धांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब भड, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, हिराचंद शिंदे, नागेश काजळे, मोहन भड, बालाजी पैकेकर, सतीश यादव, बालाजी भड, शांताराम कुंभार विठ्ठल भड, अनिल यादव, बाळासाहेब भड, विलास लोहकरे, गुलाब रोहिले तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय भड, सचिव विजय भड, दिपक भड आदी पदाधिकारी उपस्थित होते.