कारी परिवर्तन सेवाभावी संस्थेचा उपक्रम
आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात कारी परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक, कारीगावचे नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कारीत नूतन पोलीस निरीक्षक, सरपंच, उपसरपंच यांचा सन्मान
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षितराजे विधाते यांनी केले. याप्रसंगी कारी गावचे सुपुत्र विजयानंद पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे उपनिरीक्षक महेश काळे, कारीगावच्या प्रथम नागरिक निलम अनिल कदम, उपसरपंच खासेराव विधाते व नूतन ग्रा पं सदस्य अतुल चालखोर ,अमोल तेलंगे, राजाभाऊ गादेकर, ईलाई मुलानी, श्रीकांत काळे, लता डोके, सनाफिरदोस मुलानी, अधिका चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज यादव, सचिन पाटील अनिल कदम, महेश डोके, जमीर मुलाणी , बापू चव्हाण आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश व्हटकर, अविनाश कावळे, तुषार माने, गजानन गंभीर, बापू वाघे, लक्ष्मण गादेकर, महेश येडवे, विजयकुमार गादेकर, कल्याण डोके, महेश करळे, अमोल लोहार आदींनी परिश्रम घेतले. आभार संतोष जगदाळे यांनी तर सूत्रसंचालन आसिफ मुलाणी यांनी केले.