fbpx

मैंदर्गीत ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान; छत्रपती प्रतिष्ठानचा उपक्रम

कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती दिपोत्सव व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दिपावली पाडवाच्या पुर्वसंध्येला दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते, याच मुहूर्ताचे औचित्य साधून मैंदर्गीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवण्यात आले.

उपस्थित सत्कार मूर्तीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. विजया काळे उपस्थित सर्व महिलांना उद्देशून मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, या धकाधकीच्या जिवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रा. सुरेखा होळीकट्टी म्हणाल्या की, प्रतिष्ठानच्यावतीने आजपर्यंत विविध क्षेत्रात समाजाप्रती केलेले कार्य हे उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे. आजचा हा सन्मान फक्त आमचा सन्मान नसून समाजात रूढ असलेल्या “चुल आणि मुल” या पध्दतीला छेद देत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या त्या ज्ञात अज्ञात अशा सर्व महिलांचा आहे. व्याख्यान, सन्मान यांसारखे अनेक उपक्रम राबवून महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे अशा मार्गदर्शक सुचनाही होळीकट्टी यांनी मांडल्या.

यांचा झाला सन्मान
१) दिप्तीताई किरण केसूर (नगराध्यक्षा मैंदर्गी नगरपरिषद, मैंदर्गी)
२) राजश्री रामचंद्र निंबाळ (उपनगराध्यक्षा मैंदर्गी नगरपरिषद, मैंदर्गी)
३) डॉ. विजया संजय काळे (B.A.M.S)
४) सुरेखा बसवराज होळीकट्टी ( प्राचार्य. विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूल )
५) पार्वतीबाई नागठाण (राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित)
६) उज्वला चंद्रकांत अफजलपुरकर (सेवानिवृत्त शिक्षीका आदर्श प्राथमिक शाळा मैंदर्गी)
७) स्मिता महादेव नागणसुर (सहायक अभियंता मैंदर्गी न.प. मैंदर्गी)
८) राजश्री बसवराज मसूती (जि.प.प्रा. कन्नड मुलांची शाळा मैंदर्गी शिक्षिका)
९) विजयालक्ष्मी बसवराज भैरामडगी (जि.प.प्रा. कन्नड मुलांची शाळा)
१०) सुभद्रा शिवराज बंडे (प्राध्यापिका शिवचलेश्वर महाविद्यालय मैंदर्गी )
११) लक्ष्मी संगमनाथ हसरमनी (विवेकानंद पतसंस्था मैंदर्गी )

हा सन्मान निर्मला फुलारी, ज्योती अकोबा, भारती अष्टगी, सुरेखा गडेद, शुभांगी पेडसंगी, सोनिका बंडे, काशीबाई सरसंबी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वेदमूर्ती संगय्या शास्त्री, ऍड.विश्वनाथ पाटिल, किरण केसूर, बसवराज मसूती, बसवराज भैरामडगी, महादेव नागणसुर, चंद्रकांत अफजलपुरकर, रामचंद्र निंबाळ, संगमनाथ हसरमनी, औदुंबर चव्हाण, मल्लिकार्जुन सलगर गावातील महिलासह, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *