कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित शरदचंद्र पवार कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रथम कुंतल कुमार तेलंगे (८०.१६ टक्के गुण), द्वितीय रेश्मा सातलींग कोकणे (७८.८६ टक्के गुण), तृतीय साक्षी बालाजी देसाई (७८.६६ टक्के गुण).
शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातून प्रथम द्वितीय तृतीय येण्याचा मान मिळवला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, सचिव डॉ अनिल बारबोले, मुख्याध्यापक एम .एस. भुसारे, ए. आर. जाधव, एन. आर. चव्हाण, एस. एम .मनगिरे, एस. एस. वाघे, एम. एम .काळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.