कुतूहल न्यूज नेटवर्क
लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात उस्तुरी येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एकत्रच हृदयविकाराचा झटका आल्याने या परिसरात शोकाकुल वातावरण आहे. मयत दामपत्याचं सिद्रामप्पा आणि ललिता इटले असं नाव आहे.
एकाच दिवशी पती-पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू; ४५ वर्ष संसार केला
आधी सिद्रामप्पा यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यूच्या धक्क्याने ललिता यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचंही निधन झालं. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पती-पत्नीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या पती पत्नीने ४५ वर्ष संसाराचा गाडा हाकला. या दाम्पत्याला चार विवाहित मुले आणि नातवंडे, सुना असा परिवार आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.