कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: पती-पत्नीत छोटे मोठे भांडणे सारखे होत राहतात. पण कोणी आपलं स्वतःच राहते घर पेटवून देत का, होय ही घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला आग लावून टाकली.
बार्शी: बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला लावली आग
याबाबत ज्योती सचिन नाईकवाडी (रा. नविन रेल्वे स्टेशन, बार्शी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवरा सचिन प्रदीप नाईकवाडी याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन नाईकवाडी हा रिक्षा चालक असून त्यास दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे नवरा– बायकोत दररोज भांडण होते. ज्योती मजुरी काम करुन संध्याकाळी घरी आल्या तेंव्हा सचिनने स्वयंपाक का करत नाही. स्वयंपाक नाही केला तर घर जाळून टाकीन असे म्हणून शिविगाळ करुन मारहाण केली.
त्यामुळे ज्योती घरातून बाहेर पळून गेल्या. थोड्या वेळानंतर त्या शेजारी राहणाऱ्या मिनाक्षी केंगार यांच्या घरी गेल्या असता त्यांनी सांगितले की, सचिनने घरातील कपडे गोळा करुन लाईटचे शेगडीवर टाकून शेगडी चालू करुन घरातून बाहेर निघून गेला.
सचिन मारहाण करेल या भीतीने त्या घरी न जाता थेट पोलिस ठाण्यात गेल्या. व पोलिसांना घेवून घरी गेल्या असता घरातील वापरती कपडे, धान्य, टिव्ही, सोफासेट व संसार उपयोगी वस्तु जळून अंदाजे 30,000/- हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले. (Husband set fire to house due to quarrel with wife in barshi)