fbpx

अंबानी, बजाज असो की मित्तल शेतकऱ्यांना लुटाल तर चाबकाचे फटके मारू: शंकर गायकवाड

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी दि.३ जूलै:
राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळवून देणे संदर्भात बार्शी तालुक्यातील भोईंजे गावात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली. त्यावेळी बैठकीतील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, सर्व पिकविमा कंपन्या या अंबानी, मित्तल व बजाज सारख्या बड्या उद्योगपतींच्या असून हे उद्योगपती कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांना लुटून स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचे काम करत आहेत, परंतु आंम्ही आता शांत बसणार नाही.

कायद्याची पायमल्ली थांबवण्यासाठी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना लुटणारे हे बडे उद्योगपती चाबकाने फोडून काढू असा इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी दिला. दरवेळी फक्त आंदोलनात येणाऱ्यांनाच योग्य भरपाई देऊन आंदोलनाची हवा काढून, इतर शेतकऱ्यांना कमी पैसे दिले जातात किंवा बुडवले जातात असा गंभीर आरोपही यावेळी गायकवाड यांनी केला.

यावेळी काशिनाथ उमाटे, सिताराम डांगरे, राम निकम, मुहम्मद मुजावर, रामभाऊ चंदनशिव, अभिमान निकम, बालाजी उमाटे, भिमराव पिगंळे, पांडुरंग उमाटे, तुकाराम पिंगळे, संजय सुरवसे, राजेंद्र राखुंडे, भारत उमाटे, धनाजी उमाटे, बाळु मुळे, विठ्ठल उमाटे, अर्जुन नवले, किसन नवले, छगन मुळे, पांडुरंग कवटे, पेरेलाल मुसळे, विठ्ठल डांगरे, धर्मा नवले, गणेश खुळे, जोतिराम उमाटे, जोतीराम कानगुडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार हनुमंत भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *