कुतूहल न्यूज नेटवर्क
Lockdown:मुबंई ते पांगरी केला अनिकृत प्रवास ; गुन्हा दाखल
पांगरी : पांगरी ता बार्शी येथे एका इसमाने जिल्हाबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघण करून मुंबई ते पांगरी असा प्रवास केला आहे,त्या इसमा विरिद्ध पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
अधिक माहिती अशी की,पांगरी गावाचे तलाठी श्रीकांत शेळके यांना माहिती मिळाली की,एक इसम अनधिकृत पणे मुंबई येथून दि. 21 एप्रिल रोजी सांयकाळी 5 वा चे सुमारास मोटार सायकल वरून पांगरीत आला आहे.त्यानंतर तलाठी शेळके व ग्रामसेवक माने यांनी या इसमाची चौकशी करुन त्या इसमाविरिद्ध जमावबंदी, संचारबंदी लागू केली असताना देखील त्याने शासनाचे आदेशाचे उल्लंघण करून सार्वजनिक सुरक्षिततेस धोका होईल आणि मानवी जीवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल हे माहीत असताना देखील विनाकारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केल्यामुळे त्या इसमाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तलाठी शेळके यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.