दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
कल्लहिपरगे ते नाविंदगी पाणी टाकी रस्त्याचे काम तात्काळ चालू करा ; शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख
अक्कलकोट : कल्लहिपरगे ते नाविंदगी पाणी टाकी ३.९० किमी २ कोटी ८७ लाख रुपये निधी मंजूर असून कोरोनामुळे रस्ताचे काम सुरुवात होण्यासाठी विलंब झाले आहे. रखडलेल्या रस्ताचे काम त्वरीत चालू करा, असे तालुका प्रमुख संजय देशमुख प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
स्थानिक राजकीय लोक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा वारसदार असल्यासारखे समाजात वावरतात. त्याच्या फायदा घेत लोकप्रतिनिधींनी,हि लोकं मला सोडून कुठेही जाणार नाहीत असे गृहित धरून लोकांची दिशाभूल करून संपूर्ण गावाला विकासापासुन वंचित ठेवतात. त्यामुळे गावाला गृहित धरुन विकासासाठी निधी मिळत नाही. रखडलेले काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे व तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागात कामासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, उपप्रमुख प्रा. सुर्यंकात कडबगावर, प्रविण घाटगे, शहर प्रमुख योगेश पवार ,सैपन पटेल माजी तालुका प्रमुख सैपन निकते, विभाग प्रमुख पंडित मोरे, उपविभाग प्रमुख चौडपा गुजा ,उपविभाग प्रमुख रजपूत, उमेश साळुंके, खंडू कलाल , तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षी चव्हाण शहर प्रमुख.वैशाली हावनुर, उपप्रमुख ताराबाई कुंभार ,खंडू कलाल, प्रसिद्धी प्रमुख बसवराज बिराजदार व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.