कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री यांच्या पुतळ्याचे स्वाभिमानीने केले चंद्रभागा नदीत विसर्जन
पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांच्याविषयी दूध आंदोलनामध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी खांद्यावरून नेवून चंद्रभागा नदीमध्ये पुतळ्याचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, “एकच गट्टी राजू शेट्टी” अशा जोरजोरात घोषणा दिल्या.

सदाभाऊ खोत यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात माढा व पंढरपुर मतदार संघातून झाली होती. परंतु त्यांच्या बेताल वागण्याने, शेतकर्यांचा विश्वासघात करुन,कोरडा कळवळा आणून, सरकार विरोधात आंदोलन करत असताना जाणीवपूर्वक राजु शेट्टींवर टिका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट नारळी पौर्णिमे दिवशी त्यांचा प्रतीकात्मक पुतळा चंद्रभागा नदीत बुडवून करत आहोत. तसेच यापुढे पंढरपूर भागातील शेतकरी आपल्या पाठीमागे येणार नाहीत. असे स्वाभिमानीचे सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी, शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.