बार्शी: सध्या बार्शी तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुका जाहीर झाले असून यात अनेक उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत. जामगाव आवटे या गावातील अनिता शंकर भिवरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध प्रिया बजरंग गडदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या उमेदवारीसाठी वयाची एकवीस वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे परंतु यामध्ये प्रिया बजरंग गडदे यांनी उमेदवारी अर्जासोबत जन्माचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला जोडला त्यामध्ये त्यांनी जन्मतारखेत फेरबदल केलेला आहे त्यामुळे शासनाची फसवणूक त्यांनी केली आहे, असा आरोप करत अनिता शंकर भिवरकर यांनी त्यांच्या विरुद्ध शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा तक्रारी अर्ज राज्याचे राज्य निवडणूक आयोग, मुख्य सचिव (महाराष्ट्र राज्य), जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर, तहसीलदार बार्शी, पोलीस निरीक्षक बार्शी आणि निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत जामगाव (आ) त्यांच्याकडे दिला आहे असे यावेळी सांगितले.