कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : पांगरी ता बार्शी येथील गुळवे आपले सरकार सेवा केंद्राचे उद्धाटन निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार आदेश दुनाखे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, मंडळ अधिकारी विरेश कडगंची, विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले, महसूल सहाय्यक नागोराव करहाळे, रामराजे जाधवर, उपसरपंच धनंजय खवले, सचिन ठोंबरे, इरशाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पांगरीत आपले सरकार सेवा केंद्राचे निवासी नायब तहसीदारांच्या हस्ते उद्धाटन
याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार मुंडे यांनी आपले सरकार सेवा केंद्र संचालक आकाश गुळवे यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नायब तहसीलदार आदेश दुनाखे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन इरशाद शेख तर आभार आकाश गुळवे यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount