कुतूहल न्यूज नेटवर्क
ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन
पांगरी प्रतिनिधी दि.25 : ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल,ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार,डॉ.रवींद्र माळी,प्रा.विशाल गरड यांच्या हस्ते करण्यात आले.कोरोना बाधित गरोदर मातांसाठी 10 ऑक्सिजन बेड व इतर कोविड रुग्णांसाठी 10 ऑक्सिजन बेड या सेंटरमध्ये असणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुहास देशमुख होते.
हे ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी अमृत असून,रुग्णांसाठी याचा मोठा फायदा होईल.असे मत प्रा.विशाल गरड यांनी मांडले.कोरोना होवू नये यासाठी प्रत्यकाने मास्क,सॅनिटाझरचा वापर करावा,असे यावेळी सपोनि सुधीर तोरडमल यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालयातील सुविधेसाठी वेळोवेळी प्रयत्न करेन असा शब्द जि .प.सदस्या रेखा राऊत यांनी दिला.तसेच या कोविड उपचार केंद्रासाठी अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार पत्रकार इरशाद शेख यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत, सपोनि सुधीर तोरडमल, सरपंच युन्नुस बागवान,विष्णू पवार, जेष्ठ पत्रकार तात्या बोधे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.रवींद्र माळी, ग्राहक समिती प.महा.अध्यक्ष दशरथ उकिरडे, डॉ.आरिफ शेख, विजय गरड, चंद्रकांत गोडसे, जिवा देशमुख, पत्रकार गणेश गोडसे, पत्रकार बाबा शिंदे, सतीश जाधव,कमलाकर पाटील आदीं प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार इरशाद शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.रवींद्र माळी यांनी केले.