कुतूहल न्यूज नेटवर्क : आसिफ मुलाणी
कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील खंडोबा ग्रामदेवस्थान मैदान येथे युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच खासेराव विधाते यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.०५) करण्यात आले.
कारी येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५५५५ रुपये हे उपसरपंच खासेराव विधाते व माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल चालखोर, १११११ रुपये हे अशोक डोके व रवींद्र आटपळकर, तृतीय ७७७७ रुपये दत्तात्रय चौधरी व वैभव डोके, चतुर्थ ५५५५ रुपये हे राजेश पवार, तर माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश सारंग यांच्यावतीने ३३३३ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यासह वैयक्तिक स्वरुपातील विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी ग्रा.पं. सदस्य अतुल चालखोर, सचिन डोके, रवींद्र आटपळकर, विनायक ढेंबरे, राहुल शिंदे, सज्जाद मुलाणी, महेश कावळे, सोनू कावळे, भैय्या सारंग, रोहित खांडेकर, ऋषिकेश लक्षे, रणजित विधाते, नीहाल मुलाणी, महेश देसाई, आकाश शिंदे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.