कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील वैराग येथे कॉम्पो एक्सपर्ट जर्मनी कंपनीचे अधिकृत विक्रेते यश ॲग्रो एजन्सीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उस्मानाबाद बँकेजवळ बार्शी रोड येथे करण्यात आला.
वैराग येथे यश ॲग्रो एजन्सीचा शुभारंभ
यावेळी कॉम्पो एक्सपर्ट कंपनीची उत्पादने ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असून शाश्वत शेतीसाठी अतिशय चांगली आणि दर्जेदार आहेत. त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा तसेच आम्ही यश एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा व बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिक पाहणी करूनच मार्गदर्शन देऊ असे वितरक अमोल धावणे यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी धावणे यांना नविन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे विक्रांत (बाळराजे) पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, निरंजन भूमकर, युवनेते अजितदादा बारंगुळे, डॉ. विजय कादे, मोहोळचे पोतदार, ॲड. प्रशांत एडके, प्रशांत शेटे आदी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.