fbpx

कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे; सर्वाधिक लसीकरण करणारा जगातील पहिला देश

कुतूहल न्यूज नेटवर्क
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं वर्णन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातली जगातील ६ देशांमधली आकडेवारी दिली आहे. यामध्ये भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *