fbpx

Space Education: स्पेस एज्यूकेशन संदर्भातील, शालेय स्तरावरील भारतातील पहिला प्रयोग

कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: आज संपूर्ण जग विकासाची वाट चालत आहे. विकासाच्या व तंत्रज्ञानाच्या आधारे माणूस केवळ पृथ्वीपूरताच मर्यादित राहिला नाही, तर अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वत:ची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे. संपूर्ण जगात १९५ देश आहेत. या प्रत्येक देशाकडे स्वतःची अंतराळ संस्था आहेच असे नाही. १९५ देशांपैकी जगात फक्त ७२ देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ७२ स्पेस एजन्सींमधील सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी म्हणजे ‘नासा’ (NASA) होय. नासाच्या सहकार्याने एकमेव असे सुरू असलेले जगातील युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर ( U.S. Space & Rocket Center), हन्टस्वीले, अल्बामा येथे हे सेंटर तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखविणे हा मुख्य उद्देश आहे. या सेंटरमध्ये ट्रेनिंग प्रोग्रामसाठी स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामाच्या  ॲम्बॅसिडर आणि स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाउंडेशनचे संस्थापक-संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.

सुदेष्णा परमार पुढे म्हणाल्या, ‘ही परीक्षा इयत्ता ६ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार आहे. हे येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचे आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना आयेशा सय्यद म्हणाल्या, ‘ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमातील शाळा, सेमी इंग्रजी शाळासाठी आहेच; शिवाय यामध्ये जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी २० जुलै २०२३ ते १५ ऑगस्ट २०२३पर्यंत करण्यात येईल.

२० ऑगस्ट २०२३ रोजी ही परिक्षा महाराष्ट्रातील नावनोंदणी झालेल्या सर्व शाळांमध्ये होईल. या परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट २०२३ रोजी घोषित होईल. या परीक्षेतून ज्याची निवड होणार आहे, त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पुण्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे.’

त्याचबरोबर सिंगापूर सायन्स सेंटरसाठी या परीक्षेमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सिंगापूर सरकारने संशोधन आणि पॉप्यूलर सायन्सबद्दलची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना समजावी याकरीता या सेंटरची उभारणी ४५ वर्षांपूर्वी केली आहे. अंतराळ निरीक्षण, थ्रीडी ओमनी थिएटर आहे. या सर्व प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थी स्वतः सहभागी होतात.

या प्रसंगी सेडॉर इंटरनॅशनल आणि स्वान फाऊंडेशनचे संचालक एम. तिरुमल म्हणाले, ‘पालक आज अनेक रिऑलिटी शोमध्ये आपल्या मुलाने सहभागी व्हावे याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु की परीक्षा अंतराळ एज्यूकेशनच्या (Space Education) दृष्टीने खूप महत्वाची असेल. त्याचबरोबर पॉप्यूलर सायन्स खूप कमी उपक्रम शालेय जीवनात पाहायला मिळतात. ही परीक्षा या निमित्ताने महत्वाची असणार आहे.’

3 thoughts on “Space Education: स्पेस एज्यूकेशन संदर्भातील, शालेय स्तरावरील भारतातील पहिला प्रयोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *