कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीतील पाणी पुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
पांगरी : पांगरी ता बार्शी येथील पाणी पुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून पाथरी तलाव ते पांगरी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाहणी दौरा करण्यात आला.
याप्रसंगी पाईपलाईन वरील गळत्या बंद करणे, एयर वॉल दुरुस्त करणे, जलशुद्धीकरण केंद्रामधील टूब मॉडेल परत बसविणे आदी दुरुस्तीचे कामे तसेच ममदापूर तलावातून येणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणण्यासाठी लागणारी पाईपलाईनचे अंदाजपत्रक ग्रामीण पाणी पाणीपुरवठा जि.प. सोलापूर यांचे कडून करून घ्यावे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बार्शीचे उपअभियंता विजय नलवडे व शाखा अभियंता जी.एस. करळे यांनी सुचविले आहे.
यावेळी ॲड. अनिल पाटील, प्रा. संजीव बगाडे, विष्णू पवार, इरशाद शेख, शहाजी धस, जयंत पाटील, सतीश जाधव, दिलीप जानराव, मिठू काकडे, पाणी पुरवठा कर्मचारी संतोष बगाडे आदी उपस्थित होते.