प्रा.डॉ. गायसमुद्रे व सहकारी संशोधक यांनी मिळवले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट
बार्शीच्या झाडबुके महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागास आंतरराष्ट्रीय पेटंट
कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील प्रा. डॉ. कविता नारायण गायसमुद्रे यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ब्राह्मी, बीट आणि पालक यांच्या मिश्रणाने बनिलेल्या कुकीज (बिस्कीट) साठी पेटंट प्राप्त झाले आहे. दुसरे पेटंट त्यांनी डिझाईन केलेल्या हृदयाचे ठोके मोजणाऱ्या उपकरणासाठी भारत सरकारकडून प्रकाशित होणाऱ्या पेंटट ऑफिस संशोधन पत्रिकेत प्रकाशित केला आहे.
ब्राह्मी चवीने तुरट व कडू आहे या मिश्रणामुळे व बिस्किटमुळे कडवटपणा कमी होतो व खाण्यासाठी चवदार लागते. ब्राह्मीची मुख्य क्रिया मेंदू व मज्जातंतूवर होत असते. त्याच्या वापराने मेंदूला शांतता येते आणि पुष्टी मिळते या गुणामुळे ब्राह्यी खास करून मानसिक ताणतणाव , उन्माद, अपस्मार अशा विकारांमध्ये आवर्जून वापरली जाते. ब्राह्यी मतिभंश व गतिभंश या दोन्ही स्थितीत देता येते व स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त असते .या इनोवेशन मध्ये ब्राह्मी बीटरूट आणि पालक यांच्या सोबत तयार करून किंवा केलेले आहे .त्याचे मेंदूच्या विकारावर भविष्यामध्ये उपयोगी पडेल या बिस्किटा मुळे मेंदूच्या उपचारपद्धतीमध्ये किंवा मेंदूचे विकार व इतर शारीरिक व्याधी कमी होण्यास मदत होणार आहे. डॉ कविता नारायण गायसमुद्रे यांच्यासह इतर सहकारी संशोधकांनी बनवलेल्या कुकीज प्रक्रियेचे पेटंट मिळवले आहे. त्याचे पेटंट मिळावे यासाठी २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्ज करण्यात आला होता . तत्पूर्वी या मिश्रणाचे विविध पातळ्यांवर परीक्षण करण्यात आले. १४ एप्रिल २०२१ रोजी या संशोधनास पेटंट मिळाले.
गेल्या काही दशकांमध्ये जगभरामध्ये मध्ये हृदयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या हृदय रोगामुळे जागतिक मृत्युदर जास्त आहे. हृदयरोगाच्या रोगनिदानासाठी विविध प्रकारच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. परंतु या पद्धतीमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. रोगनिदानासाठी उशीर झाल्यामुळे रोग बळावलेला असतो. ते टाळण्यासाठी रोगनिदान लवकर झाले तर मृत्यू कमी होण्यास मदत होते.
डॉ गायसमुद्रे व त्यांच्या सहकारी संशोधक टीमने तयार केलेल्या त्यांनी डिझाइन केलेल्या इनोवेशन मध्ये इंटरनेट, मोबाईल व ब्लूटूथच्या साह्याने हृदयाचे ठोके नियमित व अनिमित सहज मोजता येणार आहेत. त्यामुळे अचूकता आणि हृदय रोग रोगनिदानासाठी भविष्यामध्ये उपयोगी पडेल व मैलाचा दगड ठरेल. १३ फेब्रुवारी २०१९ मध्ये डॉ गायसमुद्रे यांनी या संशोधनाची भारतीय पेंटट साठी अर्ज केला व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी भारत सरकारकडून प्रकाशित होणाऱ्या पेंटट ऑफिस संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले आहे. या दोन्ही पेंटटसाठी डॉ गायसमुद्रे व त्यांच्या सहकारी संशोधक यांचे बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई झाडबुके, संचालिका वर्षाताई ठोंबरे, माजी प्राचार्य डॉ एच. एस .पाटील, नवनियुक्त प्राचार्य डॉ मनोज गादेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.