कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत उद्योजक महिलांचा सन्मान
पांगरी : पांगरी (ता.बार्शी) येथे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्र ग्राहक समिती स्वयंम शिक्षण प्रयोग व कुतूहल परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने पांगरी भागातील उद्योजक महिलांचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, ज्येष्ठ पत्रकार तात्या बोधे, ग्राहक समिती तालुकाध्यक्ष विष्णू पवार, पश्चिम महाराष्ट्र ग्राहक समिती अध्यक्ष दशरथ उकिरडे आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच सुरेखा लाडे यांचा सत्कार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आला. ग्राहक समिती व स्वयंम शिक्षण प्रयोग व कुतूहल परिवार यांच्या वतीने मसाला पदार्थ तयार करणाऱ्या महिला आशा शेळके, बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र चालक सोनाली बगाडे, गोरमाळे येथे शाम्पू व सुगंधी अत्तर तयार करणाऱ्या सुशीला सोनवणे, लता आव्हाड यांचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनिषा धस, मैनाबाई बगाडे, प्रमिला नारायणकर, सुवर्णा गाढवे, हिराबाई काकडे, शुभांगी कुंभार या राजकारणातील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुष्पा बोधे, सुशीला सोनवणे, नजमुल शेख,अनिता चांदणे आदी महिला उपस्थित होत्या.जिल्हा पातळीवर महिला बचत गटामार्फत अन्नधान्य पुरविण्याचे काम केल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी तात्या बोधे, अनिता चांदणे, दशरथ उकिरडे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.