कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या कमल कुंभार (Kamal Kumbhar ) यांना जागतिक महिला दिनी केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा नारीशक्ती पुरस्कार राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखधार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार यांना नारीशक्ती पुरस्कार
पशुपालन तसेच सौरऊर्जा उपकरणांद्वारे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला आहे. त्यांना नीती आयोगाच्या “वुमन ट्रान्सफार्म” तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या “इक्वेटर” पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. आज कमल यांच्याकडे सहा वेगवेगळ्या सुक्ष्म उद्योगांची मालकी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त २०२१ च्या उद्योजक म्हणून कमल कुंभार यांना नारी शक्ती (Naree Shakti Award Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (International Women’s Day Kamal Kumbhar was honored with Nari Shakti Award as the Entrepreneur of 2021)