fbpx

पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून गुन्हा नोंदवा

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष पत्रकार शहबाज दिवकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने बार्शीचे निवासी नायब तहसीलदार संजीवनी मुंडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात गुंडाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. याबाबतची कसून चौकशी व्हावी व गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच शाबाद दिवकर हे कसारा रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेले असता तक्रार नोंदवण्यास नकार देणाऱ्या उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक देणाऱ्या कसारा रेल्वे पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दिवकर व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारावर अवैध व्यवसायिक वाळू माफिया व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गुंडाकडून हल्ले केले जातात व पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो याबाबत पत्रकारांना त्वरित न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ बार्शी तालुकाध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष तानाजी घोडके, तालुका संघटक भैरवनाथ चौधरी, सहसचिव गौतम नागटिळक, कमल मुसळे, मनीषा कदम, ज्योती दांगट, लता यादव, सुनंदा चव्हाण, ज्योती कसबे आदीजण उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा !  या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *