fbpx

आमदार राजेंद्र राऊत यांच्याहस्ते जवळगाव प्रकल्पात जलपूजन

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासन दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासंदर्भात, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेत्यांसह संबंधितांशी पत्रव्यवहारही केल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार राऊत यांनी तालुक्यातील मुंगशी (वाळूज), सासुरे या गावांना भेट दिली. शेतकरी बांधवांच्या शेतामधील झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नागझरी नदीवरील बंधाऱ्याची पाहणी करून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर, तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पातील पाण्याचे पूजनही त्यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती अनिल डिसले, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी जि. प. सदस्य संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, जेष्ठ नेते कुंडलिराव गायकवाड, जि.प. सदस्य श्रीमंत थोरात, पं.स. माजी उपसभापती अविनाश मांजरे, उमेश बारंगुळे, सरपंच सागर डिसले, नानासाहेब धायगुडे, पत्रकार बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *