fbpx

महागांव ग्रामपंचायत सरपंच पदी जनाबाई पवार तर उपसरपंच पदी हनुमंत मोरे

बार्शी तालुक्यातील महागांव ग्रामपंचायतीवर जय हनुमान महाविकास आघाडीच्या सरपंच जनाबाई राजू पवार व उपसरपंच पदी हनुमंत संभाजी मोरे यांची बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री काशिद यू.बी यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक एस.एस खोबरे उपस्थित होते. ७ सदस्य असलेली महागांव ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान महाविकास आघाडीने ५ जागा जिंकून बहुमत प्राप्त करून ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला.

सदर निवडी प्रसंगी अश्विनी अरूण पाटील, दिपाली विशाल चापले,  ज्योती मेघनाथ गायकवाड हे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोसायटी चेअरमन कल्याण घोलप, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, माजी उपसरपंच बिभीषण घोलप, माजी उपसरपंच  सुभाष घोलप, मावळते उपसरपंच  अनिल घोलप, शालेय समिती अध्यक्ष संतोष गोरख घोलप , माजी उपसरपंच  विलास कोकरे, विलास घोलप, तंटामुक्त समिती अध्यक्ष आण्णासाहेब पाटील,अरूण पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी शंकर वसंत घोलप, शहाजी घोलप, श्रीहरी मोरे, विजयकुमार घोलप, हनुमंत कांबळे, कमलाकर चापले, डॉ. अमोल मोरे, डॉ.मेघनाथ गायकवाड, उमेश घोलप, शंकर मोरे, शंकर चापले, शशिकांत मोरे, विशाल चापले, समाधान पाटील, रामभाऊ चापले, नारायण चापले, मारूती कोकरे, सुखदेव ढावारे, मोहन गायकवाड, पोपट महाराज घोलप, बाबा मोरे, लक्ष्मण चापले, ऋषीकेश पाटील, धर्मराज चापले, दयानंद कोकरे, गोरख कोकरे व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, नवनियुक्त सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *