कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : जगभरात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक परिस्थिती दाखवणारी आली. गेल्या वर्षी आलेल्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील देशातील सर्वच नागरिकांनी एकमेकांना मदत केली. अनेकांनी अन्नछत्रालय उभा केली. परंतु, यावर्षी क्वचित अन्नछत्रालय चालू दिसले. परंतु रुग्णांची नातेवाईकांची अल्पोपहाराची गैरसोय होऊ नये म्हणून बार्शी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या शैलजा गीते, स्मिता देशपांडे, परिवर्तन संघटनेच्या सुगंधा आगवणे व रफिक पठाण यांच्या कडून मोफत अल्पोपहाराची सोय करण्यात आली.
बार्शीतील जिजाऊ ब्रिगेडच्या माता-भगिनी करत आहेत रुग्णांची तसेच नातेवाईकांची अल्पोपहाराची सोय
यामध्ये दररोज जगदाळे मामा हॉस्पिटल येथील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोफत नाश्ता दिला जातो,असे विजेता टाइम्स शी बोलताना शैलजा गीते यांनी सांगितले. तसेच या गोष्टी करत असताना आम्हाला बार्शीतील इतर संघटनांनी मदतीचा हात द्यावा,असे जिजाऊ ब्रिगेड च्या शैलजा गीते यांनी आव्हान देखील केले आहे. तरी यांचा कार्यास सर्व बार्शीकर यांनी सलाम केला आहे.