कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : असिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील जियो (Jio) नेटवर्क सेवा मागील चार दिवसांपासून विस्कळीत झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोबाईलद्वारे एकमेकांशी संवाद साधत असताना समोरच्या व्यक्तीला आवाज ऐकू न येणे, फोन न लागणे असे प्रकार घडत असल्याने जियो ग्राहकांना मोबाईलद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यास अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाईन होत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणीचा सामना करावा लागत असून जियो नेटवर्क सेवा सुरळीत सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
कारीत जियोची नेटवर्क सेवा ‘कोमात’; फोन लावणे ही झाले अवघड
मी तीन, चार वर्षांपासून जियो सिमकार्ड वापरत असून इतके दिवस चांगली सुविधा मिळत होती. परंतु मागील काही दिवसांपासून जियोला नेटवर्क नसल्याने कोणाला ही संपर्क साधता आला नाही. अविनाश कावळे, कारी.
माझी दोन दिवसांपासून परीक्षा सुरू झाली आहे. गावात जियोला नेटवर्क नसल्याने मला गावाच्या बाहेर जाऊन ज्या ठिकाणी नेटवर्क मिळेल तिथे जाऊन पेपर द्यावे लागत आहेत. ऋतिक वाघमारे, विद्यार्थी.