कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील पुरोगामी विचार मंचच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक व पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पत्रकार संजय बोकेफोडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार संजय बोकेफोडे पुरस्काराने सन्मानित
हा कार्यक्रम बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ कोळेकर, प्रमुख पाहुणे वक्ते प्रा. चंद्रकांत खंडागळे, ज्येष्ठ विचारवंत व लेखक काँ.प्रा.तानाजी ठोंबरे, सत्यजित जानराव, भारतीय आजाद कामगार महासंघाचे जनरल सेक्रेटरी सी.बी. गंभीर, पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष रमेश गवळी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पांडुरंग शिंदे, मुख्याध्यापक किशोर बगाडे, वैशाली जानराव, आस्तम चंदनशिवे, बाळासाहेब जगताप, राजेंद्र मंगरुळे, रोहित शिंदे, सदानंद गरदडे, अजित कांबळे, तानाजी बोकेफोडे, अण्णासाहेब काशीद, विनोद गायकवाड, प्रितेश बोकेफोडे आदी उपस्थित होते. (Journalist Sanjay Bokefode honored with the award)