कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पांगरी मध्ये पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
पांगरीत विविध ठिकाणी पत्रकारांचा सत्कार
ज्येष्ठ पत्रकार तात्या बोधे, गणेश गोडसे, संजय बोकफोडे, विवेक गजशिव, अनिल खुणे, सचिन ठोंबरे, इरशाद शेख, आसिफ मुलाणी या पत्रकारांचा सत्कार पांगरी गावच्या सरपंच सुरेखा लाडे व डॉ. विलास लाडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी रजनी पाटील, चंद्रकांत गोडसे, हनुमंत गाढवे आदी उपस्थित होते.
पांगरी पोलीसांकडून पत्रकारांचा सत्कार
संजय बोकेफोडे, गणेश गोडसे, बाबा शिंदे, सचिन ठोंबरे, इरशाद शेख या पत्रकारांचा सत्कार सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी केला. यावेळी पोलीस कर्मचारी पांडुरंग मुंढे, अर्जुन कापसे, बांगर आदी उपस्थित होते.