कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक दत्तात्रय माळी व रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी मळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कल्याण माळी यांची निवड करण्यात आली. माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी व माळी समाज बांधवापर्यंत पोहचण्यासाठी संघटनेची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये माळी सेवा संघाचे काम उत्कृष्ट पणे चाललेले आहे. सर्वच पदाधिकारी तळागाळातील लोकांपर्यंत पोचून संघटनेचे कार्य सांगत आहेत. कल्याण माळी यांच्या निवडीबद्दल श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच संजयकुमार माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, सावता परिषदेचे तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, माळी सेवा संघाचे बार्शी शहर उपाध्यक्ष गणेश बारडे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत माळी, गिरिश माळी, वैभव माळी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
माळी महासंघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी कल्याण माळी
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount