fbpx

पाकिस्तानची स्तुती केल्यामुळे कंगना होत आहे ट्रोल

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तिच्या बाबतीत घडला आहे. नेहमी पाकिस्तानवर (Pakistan) आखपाखड करणाऱ्या कंगनानं यावेळी त्यांची स्तुती केली आहे. मात्र या स्तुतीमुळं काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तिला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.

“पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं. #PakistanStandsWithIndia… भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगना राणावत हिने पाकिस्तानचे तोंडभरून कौतुक केले होते. मात्र तिने शत्रू राष्ट्राचे केलेले कौतुक अनेकांना चांगलेच खटकले होते.

तुझं डोकं ठिकाणावर आहे का? चर्चेत राहण्यासाठी आता तू काहीही ट्विट करु लागली आहेस का? मोदींच्या नजरेत येण्यासाठी ही बाई आता काहीही ट्विट करतेय अशा अशयाच्या प्रतिक्रिया देऊन या ट्विटसाठी कंगनाला सध्या जोरजार ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानचे पुढे केलेल्या मदतीवर अद्याप भारताने काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यापूर्वी सवयीप्रमाणे कंगना आपले मत मांडून रिकामी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *