fbpx

कारी येथील क्रिकेट स्पर्धेत युवा क्रिकेट संघ अव्वल, दारफळ उपविजेता

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद :आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे आयोजित क्रिकेट चषक स्पर्धेत युवा संघ प्रथम विजेता ठरला. या संघास उपसरपंच खासेराव विधाते व ग्रा. पं. सदस्य अतुल चालखोर यांच्यावतीने १५५५५ रुपये, द्वितीय बक्षीस १११११ रुपये अशोक डोके व रवींद्र आटपळकर यांच्या वतीने दारफळ क्रिकेट संघाने पटकावले. तृतीय बक्षीस कुसळंब क्रिकेट संघास दत्तात्रय चौधरी व वैभव डोके यांच्या वतीने ७७७७ रुपये तर चतुर्थ पारितोषिक राजेश पवार यांच्या वतीने ५५५५ रुपये शेलगाव क्रिकेट संघ व पाचवे बक्षीस सतीश सारंग यांच्या वतीने 3333 रुपये काळा मारुती क्रिकेट संघास देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये ५५ संघांनी सहभाग नोंदवला होता. सर्व विजेत्या संघाला संतोष कावळे यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली. यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, ग्रा. पं. सदस्य अतुल चालखोर, महेश डोके, संतोष कावळे, सतीश सारंग, जमीर मुलाणी, प्रेम सारंग, राहुल शिंदे, रवींद्र आटपळकर, विनायक ढेंबरे, सज्जाद मुलाणी, महेश कावळे, सोनू कावळे, रोहित खांडेकर, ऋषिकेश लक्षे, रणजित विधाते, नीहाल मुलाणी, महेश देसाई, आकाश शिंदे, शुभम लक्षे, एजाज मुलाणी आदी उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *