fbpx

कारी ग्रामपंचायत निवडणुकीत तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीला 9 तर जय खंडेराया ग्रामविकास आघाडीला 4 जागा

आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी:  उस्मानाबाद तालुक्यातील कारी ग्रामपंचायतसाठी 13 जागांसाठी 26 जण रिंगणात होते. 4151 यापैकी 3245 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

कारी ग्रामपंचायतसाठी जय खंडेराया ग्राम विकास आघाडी व तुळजाभवानी ग्राम विकास आघाडी या दोघांमध्ये दुरंगी लढत झाली होती. मतदार राजा कौल कोणाला देणार, सत्ता कोण खेचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आज लागलेल्या निकालांमध्ये 13 पैकी 9 जागांवर तुळजाभवानी ग्राम विकास आघाडीने विजय मिळवला तर जय खंडेराया ग्रामविकास आघाडीने 4 जागेवर विजय मिळवला.

विजयी उमेदवार तुळजाभवानी ग्रामविकास आघाडी – खासेराव विनायक विधाते, लता अशोक डोके, सनाफिरदोस जमिर मुलाणी, अधिका रघुनाथ चव्‍हाण, अतुल सदाशिव चालखोर, अमोल शिवाजी तेलंगे, राजश्री रवींद्र आटपलकर, मेघा कामराज बनसोडे, नीलम अनिल कदम,
विजयी उमेदवार जय खंडेराया ग्रामविकास आघाडी-  प्रभाकर महादेव गादेकर, इलाई इस्माईल मुलाणी, श्रीकांत अभिमन्यु काळे, सुरेखा राजेंद्रकुमार गायकवाड.

गावात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *