आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार ? २२ तारखेच्या बैठकीकडे लागले सर्वांचे लक्ष
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ग्रामपंचायत ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावातील महादेव मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.पाच प्रभाग व तेरा सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत आहे.ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडतील अशा गावांना लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.
सध्या सर्वत्र असलेले कोरोना महामारीचे संकट, निवडणूक म्हटले की गट-तट, भांडण तंटे, मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो हे सर्व टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होण्याची गरज आहे.अंतिम निर्णय हा २२ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत होणार आहे,मागील पंचवार्षिक निवडणूक वेळी चौरंगी लढत झाली होती.
या बैठकीमध्ये अमोल जाधव, खासेराव विधाते, विजयसिंह विधाते, राजू आतार,बालाजी विधाते आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल चौधरी, अतुल चालखोर, राहुल डोके, विजयसिंह विधाते, इम्रान मुलानी, सतीश सारंग आदी गावातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.