आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: सध्या सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि कारी ग्रामपंचायत ही बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारी ग्रामपंचायत बिनविरोधसाठी आमचा कसलाही विरोध नाही, परंतु निवडणुका लागल्या तर मात्र ताकदीनिशी लढणार – खासेराव विधाते
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध साठी विधाते गटांची भूमिका काय आहे असे खासेराव विधाते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गावात जो विषय चालू आहे की ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे त्या निर्णयाशी आमच्या पॅनलचा सदस्य म्हणून माझी इच्छा आहे की, गावच्या हितासाठी आमची काहीही अडचण नाही. सगळ्या तरुणांचे मत आहे आपल्या गावातील समाजसेवक अमोल जाधव यांनी जे आंदोलन केले होते ते सुद्धा गावाच्या हितासाठी योग्य होते.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधसाठी आमचा कुठलाही विरोध राहणार नाही आम्ही त्यासाठी सहकार्य करणार
परंतु जर समोरचा गट बिनविरोध साठी तयार झाला नाही त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली तर आम्ही पुर्ण ताकदीनिशी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार आमच्या पॅनल मध्ये युवक वर्गांना जास्त संधी देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे.
शक्यतो शैक्षणिक गुणवत्ता व तरुणांना जेणेकरून त्यांनाही गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची इच्छा असावी अशा तरुण वर्गांना संधी देणार, भविष्यात जर सत्ता आली तर
शेतीशी निगडीत कृषी संदर्भातील असलेल्या योजना यासाठी जास्त प्रयत्न करून गावाचा विकास करणार असे कुतूहल शी बोलताना खासेराव विधाते यांनी सांगितले.