fbpx

प्रगती फाउंडेशन कडून कारी गाव दत्तक

कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी या गावची प्रगती फाउंडेशनने दत्तक गाव म्हणून निवड केलेली आहे. प्रगती फाउंडेशन स्थापनेपासून (2020) समाजोपयोगी कार्याला गतिमान झालेले असून समाजातील गरजू, पिडीत, अनाथ, दिव्यांग, मुला -मुली पासून ते महिला व जेष्ठ नागरिकापर्यंत सर्व स्तरावर आपले कार्य सुरू केले आहे.

या फाउंडेशन ने राज्यातून एकूण नऊ गावाची निवड केली असून, हे फाउंडेशन राज्यस्तरीय कार्यक्षेत्रात काम करत आहे. यामध्ये 1000 लोकांची सक्रिय टीम आहे. प्रगती फाउंडेशन गावामध्ये सामाजिक उपक्रम, विविध विकास कामे यासाठी सर्वांगीण मदत, व कार्य करणार आहे. याचे पत्र कारी ग्रामपंचायत ला देण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी, प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष जी. एम. दिवटे, विजयसिंह विधाते, अमोल जाधव, अनिल कदम, नितीन कात्रे, प्रदीप चव्हाण, मयूर कावळे, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.

गावचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या गावाची निवड केली आहे. या फाउंडेशनला कारीकरांनी सशक्तपणे सहकार्य केले तर आणखी आम्ही उत्साहाने काम करणार आहोत. जी.एम. दिवटे, प्रगती फाउंडेशन अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *