आसिफ मुलाणी कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी गावच्या पोलिस पाटील अमृता माळी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी गावच्या पोलिस पाटील अमृता शशिकांत माळी यांना उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त कोरोनाच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, पोलीस निरीक्षक संजय बाबर व जिल्ह्यातील पोलीस पाटील आदी उपस्थित होते.