कुतूहल न्यूज नेटवर्क: दयानंद गौडगांव
विश्वमानव सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित गायन स्पर्धेत नागणसूर चे काशिनाथ मणूरे प्रथम
अक्कलकोट : विश्वमानव सांस्कृतिक प्रतिष्ठान बेंगळुरू यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशांतर्गत कन्नड गायन स्पर्धेत आंतरराज्यीय स्पर्धकांमधून अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर या गावाचे सुपुत्र काशिनाथ मणुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लाॅकडाऊनच्या काळात जवळपास सगळ्याच छोट्या-मोठ्या कलाकारांची उपासमार होत आहे, ही बाब लक्षात घेऊन अशा कलाकारांना एक संधी आणि आत्मविश्वास देण्यासाठी विश्वमानव सांस्कृतिक प्रतिष्ठान बेंगळुरू यांच्या वतीने प्रसिद्ध गीतकार डाॅ.का.वें.श्रिनीवासमुर्ती यांनी रचलेल्या कन्नड भावगीतांचा स्पर्धा आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेत प्रामुख्याने देशातील , महाराष्ट्र,केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा सह अनेक राज्यांमधील स्पर्धक भाग घेतले होते. ही स्पर्धा आॅनलाईन पध्दतीने व व्हाट्सअपच्या माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये कर्नाटक राज्यातून प्रजेत कुलकर्णी तर बाह्य राज्यातून महाराष्ट्राचे काशिनाथ मणुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.