कुतूहल न्यूज नेटवर्क : अमोल नांदेडकर
बार्शी तालुक्यातील केशरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून माल मिळावा -ग्राहक समिती तालुकाध्यक्ष
बार्शी : लॉकडाउन पासून केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून माल दिला जात आहे.पण अजूनही काही केशरी कार्ड धारकांना तहसील कार्यालयाकडून बारा अंकी नंबर मिळालेला नसून त्यांचे आधार कार्ड फिडिंग झालेला नाही ,त्यामुळे त्यांना या महिन्यात धान्य मिळालेला नाही .तरी त्याची त्वरित पूर्तता करून सर्व कार्ड धारकांना अन्न सुरक्षा यादीत सामिल करून घेवुन धान्यमाल मिळावा अशी विनंती तहसीदार यांचेकडे महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती तालुकाध्यक्ष विष्णु पावर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.