कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
खाकीतला देवमाणूस! कारीचे सुपुत्र सहा. पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचा गृहमंत्र्यांकडून सन्मान
कारी :उस्मानाबाद तालुक्यातील कारी गावचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे सोलापूर याठिकाणी कार्यरत आहेत.लॉकडाउनच्या काळात त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरी मुळे 20 सप्टेंबर रोजी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
लॉकडाउन मध्ये सोलापूर शहरात पाटील हे गस्त घालत असताना दोन महिला रस्त्यावरुन जाताना दिसल्या. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस केली असता,त्या महिलेने सांगितले की, सून गर्भवती आहे तिच्या पोटात तीव्र वेदना होत आहेत . बाहेर रिक्षा नाही पोलीस गाडी पकडतात म्हणून कोणी गाडी देईना,आम्ही इथे दवाखान्यासाठी आलो आहोत, मात्र दवाखाना सुध्दा बंद आहे, त्यामुळे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.हे ऐकताच पाटील यांनी क्षनाचाही विलंब न करता आपल्या सरकारी वाहनातून प्रसूती वेदनेने विव्हळनाऱ्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहच केले.त्याचबरोबर कोरोनाच्या काळात काही कामगारांच्या घरी धान्य संपले होते ही गोष्ट पाटील यांना समजताच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या कामगारांना जीवनावश्यक वस्तू पोहच केल्या. याशिवाय अनेकांना जेवणाचे डब्बे व वेगवेगळ्या स्वरूपाची मदत केली आहे.हे सर्व करीत असताना पाटील यांनी त्यांचे कर्तव्य ही उत्तम प्रकारे केले आहे.खाकी वर्दीतील या देव माणसाने सर्वांची मदत करत माणुसकीचा धर्म जपला आहे.