कुतूहल न्यूज नेटवर्क
हातगाड्यावर प्रचार करून युवक व नवख्या उमेदवारांनी मिळवला विजय
बार्शी: बार्शी तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खांडवी ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही राजकीय पाठिंबा नसताना केवळ सामाजिक कार्य आणि विकासाच्या मुद्यावर आकाश दळवी यांनी त्यांच्या मित्रपरिवारासह या निवडणुकीत भाग घेतला. त्यांचे विरुद्ध राजकीय आणि बलाढ्य उमेदवार उभे होते ही स्पर्धा खूप मोठी होती.
त्याच बरोबर प्रचार करतानाही लोक सोबत येत नसायचे परंतु या युवकांनी कल्पकतेचा जोरावर वायुप्रदूषण आणि खर्च टाळण्यासाठी हातगाडीवर स्पीकर लावून प्रचार केला. प्रचारात नावासाठी नाहीतर गावाच्या विकासासाठी मत द्या, भ्रष्टाचार संपविण्यासाठी मत द्या, अश्या मुद्यांवर या युवकांनी प्रचार केला. एकूण अकरा जागांपैकी आकाश दळवी यांनी नऊ जागा लढ्यविल्या, गावातील मतदारांनी देखील युवकांना पसंती देत नऊ पैकी पाच उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून दिले.
आकाश पांडुरंग दळवी, सचिन कुंडलिक चोरघडे, योगीराज कल्याण सातपुते, सुवर्णा बालाजी वाघमारे आणि मीना विनोद गपाट हे पाच उमेदवार निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर आम्हाला गावकऱ्यांनी जो आशीर्वाद दिला आहे तो आम्ही सार्थकी लावणार आणि गावाचा विकास करणे हेच एकमेव उद्दिष्ट आम्ही सर्वजण साध्य करणार असेही यावेळी विजयी उमेदवारांनी सांगितले. या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार बार्शीत सहजीवन परिवाराचे मार्गदर्शक माहिती अधिकार कार्यकर्ते मा. दिनानाथ काटकर, अध्यक्ष बालाजी डोईफोडे, ॲड. सुहास कांबळे, संतोष कळमकर, सुमित नवले, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष ॲड. सुप्रिया गुंड यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड. राजशेखर गुंड, घटनाचक्र न्युजचे संपादक सोमनाथ सेवकर, अनिल जाधव, अंकुश कंगले, विनोद गपाट, गव्हाणे मेजर उपस्थित होते. गावात देखील सर्व उमेदवारांचे स्वागत करून जल्लोष साजरा केला.