कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील विद्यार्थी कुलभूषण कंदले याने सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये महाविद्यालयातून बीएससी भाग एक दोन तीन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल महाविद्यालयामध्ये संचालिका वर्षाताई झाडबुके यांच्याकडून तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
झाडबुके महाविद्यालयात कुलभूषण कंदलेचा सन्मान
मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय संस्थेकडून याला प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल कंदले याचे संचालिका वर्षाताई ठोंबरे, प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख अरूषा नंदीमठ, प्रा. डॉ. नमिता डोईफोडे आदींनी अभिनंदन केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount