कुतूहल न्यूज नेटवर्क : विष्णू पवार
कुतूहल वर्तमानपत्राचे संपादक मंडळ निवड सोहळा संपन्न
पांगरी : साप्ताहिक कुतूहल या वर्तमानपत्राचे संपादक मंडळ निवड सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सरकारी नियम पाळून पार पडला.

यावेळी कार्यकारी संपादक विष्णू पवार,सल्लागार संपादक तात्या बोधे,उप संपादक राहुल भड, उप संपादक अशोक माळी, कायदेशीर सल्लागार ऍड.अनिल पाटील ह्या सर्वांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.
याच कार्यक्रमात जेष्ठ विधिज्ञ ऍड.अनिल पाटील यांच्या ६० व्या वाढदिसनिमित्त आणि सौ.शारदा पाटील यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी विरोधीपक्ष नेते संजय पाटील ( जि. प.सोलापूर),विलास जगदाळे, प्रा.विशाल गरड, ऍड.अनिल पाटील व जेष्ठ पत्रकार तात्या बोधे आदीं मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून कुतूहल न्यूज नेटवर्क च्या पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच इंनूस बागवान,तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,गणेश गोडसे,बाबा शिंदे,संजय बोकेफोडे,बाळासाहेब मोरे,सचिन घावटे,रजनी पाटील,धनंजय तौर,जिवा देखमुख, चंद्रकांत गोडसे,आसिफ मुलाणी,विष्णू शिंदे आदीं मान्यवर उपस्थित होते.