अमरावती: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा (Witch treatment on corona patient in Melghat) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू (Corona patient death) झाल्यानं ही घटना समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र महिलेला वैद्यकीय उपचाराला नेण्याऐवजी तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली. मात्र अघोरी उपचार महिलेच्या जीवावर बेतले. त्यामुळे 45 वर्षीय महिलेचा भवई येथील मांत्रिकाकडे उपचारदरम्यान मृत्यू झाला.