कुतूहल न्यूज नेटवर्क
किशोरकुमार बगाडे यांना लोकमतचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
पांगरी : मुलांच्या सामाजिक जीवनातील पहिला टप्पा म्हणजे शाळा. शाळेतल्या शिक्षकाबरोबर महत्त्वाची ठरते ती शाळेची इमारत मुलांना आपलीशी वाटणारी. मुलांच्या सामाजिक भौतिक जडणघडणीतील वस्तु किती मोलाची भर घालू शकते हे नमूद करणारी आणि मानसिक संकल्पना किशोर कुमार बगाडे यांची नोकरीची सुरुवात नगोर्ली ता. माढा जिल्हा परिषद शाळेतून झाली. पहिली ते चौथीपर्यंत २० पटाची शाळा.
शाळेच्या पाठीमागे जुने म्हसोबा देवस्थान ८० टक्के मुले म्हसोबा मंदिरात शाळा बुडवून जात होती. शाळेत मन लागत नव्हते. त्यामुळे पालकांच्या गाठीभेटी घेऊन पालक मीटिंग आयोजित करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. हळूहळू पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शाळेचा एकूण पट ८० झाला. आज विद्यार्थी सुजाण नागरिक बनून विविध क्षेत्रात अग्रगण्य आहेत. डॉक्टर, पोलीस, शिक्षक,प्रगतशील बागायतदार, पत्रकार अशा हुद्धयावर आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसळब तालुका बार्शी येथे बदली झाली. केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. शाळेची एकंदरीत परिस्थिती अतिशय दुरावस्थेत. शाळा मोडकळीस आली होती. गेट नाही, शाळेस वॉल कंपाऊंड खूपच छोटे, शाळेचा पट अत्यंत कमी, गावातील पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट होता. शाळेस लागून अवैध धंदे चालत असे. पांगरी पोलिस स्टेशन यांच्या सहकार्याने अवैध धंदे प्रथम बंद केले. कुसळंब शाळा केंद्रशाळा असल्यामुळे केंद्रात एकूण १७ शाळा आहेत.
शाळा मराठवाड्याच्या प्रवेश द्वाराजवळ असल्यामुळे अधिकारी पदाधिकारी शिक्षण मंत्री यांची नेहमी या मार्गावरून ये जा होत असे. शाळेचा पट संख्या ४८. शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी संजय लक्ष्मण बोकेफोडे यांची निवड झाल्यानंतर शाळेच्या बदलाला सुरुवात झाली. शिक्षकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करून शाळेला रंग रंगोटी,ध्वजस्तंभ, शौचालय, पाणी इत्यादी सुविधा करून घेतले. शाळेत नवीन बदल पाहून नागरिक शाळेकडे वळले. शाळेस मदत करू लागले. एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ब्रीदवाक्य घेऊन गुणवत्तेवर भर देेण्यात आला.
शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येऊ लागले. त्यामुळे पहिल्याच वर्षी शाळेतील स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये सहा विद्यार्थी चमकले. शाळेने प्रज्ञाशोध परीक्षेत सलग दोन वर्ष तालुक्यात, जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तर कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्र,तालुका, जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. शाळेचा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक झाला.
यामध्ये सहकारी अर्चना राऊत, मंगल शेळके, सुनिता अंकुरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बोकेफोडे यांचे खूप मोठे योगदान लाभले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी जिल्हा, तालुका,राज्य स्तरापर्यंत चमकू लागले. शाळेमध्ये संगणक कक्ष,साऊंड सिस्टिम, पाण्याची सुविधा, शाळेची संरक्षण भिंत,शाळा दुरुस्ती ही कामे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी करून दिली. गावातील इंजिनियर तुषार यांनी चार संगणक संच शाळेत भेट दिले.शाळेची घडामोड पाहून सुंदरराव जगदाळे तालुका पंचायत समिती सदस्य यांनी शाळेत भेट देऊन शाळेचे कौतुक केले आणि शाळेस प्रोजेक्टर भेट दिल्यामुळे शाळेत ई-लर्निंग सुरू करण्यात आले.२०१७ साली शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूङ व बार्शी तालुका पंचायत समित गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेस आयएसओ (ISO )मानांकन शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आत्तापर्यंत शाळेत विविध प्रकारचे १५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बगाडे सरांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकपुस्कार,जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शाळेचा कायापालट करता आला. या सर्व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्यामुळे उत्कृष्ट शिक्षक (Excellence Teacher Award) अवार्ड मिळाला.