मोहोळ प्रतिनिधी : कुतूहल न्युज नेटवर्क
लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामास सुरुवात.
मोहोळ : आज लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा १७ वा गळीत हंगाम शुभारंभ आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळपाचा हंगामास 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. राज्यातील 12 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून ऊस गाळपाची परवानगी देण्यात आली आहे. या साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनगर ता. मोहोळ येथील ‘लोकनेते बाबुराव पाटील साखर करखाना’ या एकमेव साखर कारखान्याचा समावेश होता. आज दि. 4 ऑक्टोबर रोजी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकून लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा १७ वा गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.
यावेळी “लोकनेते परिवाराचे मुख्य पाठबळ म्हणजे ‘लोकांचा विश्वास’ आणि यांचं विश्वासाच्या पाठबळावर आज लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा १७ वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.” असे आवर्जून राजन पाटील यांनी सांगितले.
शेवटी, उपस्थित मान्यवरांचे आभार मानत, आज शेतकरी सभासद बांधवांनी लावलेली उपस्थिती हेच या यशस्वी वाटचालीच्या विश्वासाचं प्रतीक आहे. उसाच शेवट टिपरू जाईपर्यंत लोकनेते कारखाना शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल असे आश्वासन ऊस उत्पादक सभासदांना लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार राजनजी पाटील यांनी दिले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, आणि प्रशासनातील सर्व प्रमुख विभाग अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास मतदार संघातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होता.