कुतूहल न्यूज नेटवर्क
बाप्पा सांगे सकलांना
बाप्पा सांगे सकलांना
विसर्जन करा ना……
वर्षानुवर्षे जोपासलेल्या त्या निरर्थक आळसाच
विसर्जन करा ना…
एकमेका प्रति बाळगेलेल्या
त्या निरर्थक द्वेषाच
विसर्जन करा ना…….
स्वतःबरोबर इतरांसाठीही
घातक असलेल्या त्या रागाचं
विसर्जन करा ना
स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या
घराची राखरांगोळी करणाऱ्या
त्या कुचकामी स्वार्थी वृत्तीच
विसर्जन करा ना….
जवळ असलेल्या गोष्टीत
समाधानी न राहता दुसऱ्याचेही
मलाच मिळावं या वाईट विकृतीच
विसर्जन करा ना
प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्याला दुःख देउन
उभारलेल्या भावनांच्या त्या कुचकामी इमारतीच
विसर्जन करा ना…..
माणूस म्हणून जगताना
जोपासलेल्या त्या मोह माया
लोभासारख्या वाईट सवयींच
विसर्जन करा ना……
आयुष्याच्या रंगमंचावर आपली
भूमिका घराब करणाऱ्या
चुका दोष अन् मीपणाच
विसर्जन करा ना…
मुलांमध्ये एकोप्याचे संस्कार रुजविनाऱ्या
एकत्र कुटुंब पद्धतीला ढासळू पाहणाऱ्या
तरुणांच्या बेजबाबदार निर्णयाच
सौ. रागिनी शरद वासकर
पांगरीकर (सोलापूर)